https://drive.google.com/drive/folders/100LZnlMdw_mixgWUqw9bm-SIjRg578gz?usp=sharing
Tuesday 5 December 2023
Wednesday 15 November 2023
शिक्षण क्षेत्रातील असामान्य व्यक्तिमत्त्व सन्मानिय दीपक शितोळे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
जिल्हा परिषद शाळा खांबाळे चे पदवीधर शिक्षक सन्मानिय दीपक शितोळे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! सन्मानिय शितोळे सर यांनी खानापूर व आटपाडी तालुक्यात नोकरी केली. विशेष करून त्यांनी जिल्हा परिषद शाळा लेंगरे व जिल्हा परिषद शाळा खानापूर, सुलतानगादे या ठिकाणी केलेल्या त्यांच्या कार्याला जवळून पाहण्याचा योग आला. लेंगरे व खानापूर गावातील लोक व विदयार्थी त्यांच्या कार्याचा अजून ही उल्लेख करतात. जिल्हा परिषद शाळा लेंगरे शाळाच्या उभारणीच्या कामात त्यांचे योगदान मोलाचे होते. तचेस खानापूर शाळेत सुध्दा त्यांनी कमी वेळ सेवा केली परंतू त्याच्या कार्याचा ठसा उमटवला.
शिक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांनी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम च्या माध्यमातून विदयार्थी घडविण्याचे काम केले. त्यांनी राबविलेला खानापूर शाळेत असतानाचा सूर्यग्रहण उपक्रम अजून ही लक्षात आहे.
विद्यार्थी निष्ठा, लोकांना सहज सुलभ भाषेत समजावून सांगण्याची त्यांची पद्धत, मनमोकळे व्यक्तिमत्त्व, वाचन, सायकलिंग ची आवड, चौकस बुद्धिमत्ता, कोणत्याही गोष्टीची खोलात जाऊन अभ्यास करण्याची त्यांची पद्धत खरंच मनाला भावते. शिक्षण क्षेत्रात जिल्हा परिषद शाळा विषयी प्रेम वाढविण्यासाठी अशा व्यक्तिमत्वाचे योगदान मोलाचे आहे. खऱ्या अर्थाने ते आदर्श शिक्षक म्हणून त्यांचे कार्य सर्वांन आदर्शवत आहे. शिक्षण क्षेत्रात त्याच्या हातून असेच उत्तम कार्य घडत जावो. ही मनपूर्वक सदिच्छा.
शितोळे सरांनी खानापूर शाळेत राबविलेला सूर्यग्रहण उपक्रम लिंक. < < < येथे क्लिक करा.
Monday 30 October 2023
Wednesday 25 October 2023
संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक १ साठी प्रश्नपत्रिका मागणी
https://forms.gle/cABo2oG68nUbia9cA
संकलित मूल्यमापन चाचणी १ प्रश्नपत्रिका मागणी वरील लिंक वर click करून माहिती भरा
लिंक भरण्याबाबत सूचना खालीलप्रमाणे आहेत .
सर्व अंक इंग्रजी मध्ये भरा .माहे सप्टेंबर २०२३ चा पट टाकावा . .सदर चाचणी सर्व जिल्हा परिषद शाळा खाजगी अनुदानित शाळा यासाठी असल्यामुळे सर्व शाळांनी सदर माहिती भरावी .मराठी व सेमी पट टाकावा.लहान शाळांनी मराठी मध्यम असेल तर फक्त मराठी पट टाकावा व इंग्रजी पट च्या ठिकाणी 0 लिहावे .व सेमी इंग्रजी शाळांनी मराठी पट ठिकाणी 0 लिहावे .सदर परीक्षा ३ री ते ८ वी मुलांसाठी आहे .
Saturday 14 October 2023
जिल्हा परिषद सांगली आयोजित गुणवत्ता शोध परीक्षेत जिल्हा परिषद शाळा खानापूरचे चार विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत.
जिल्हा परिषद सांगली आयोजित गुणवत्ता शोध परिक्षा सन २०२२-२३ च्या गुणवत्ता शोध परीक्षेत जिल्हा परिषद शाळा खानापूर शाळेचे चार विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत.जिल्हा परिषद शाळा खानापूर शाळेचा इयत्ता १ ली चा विद्यार्थी यश योगेश येडे .या विद्यार्थ्याने १०० पैकी ९२ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत चौथा व तालुका यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे .तसेच इ ३ री चा विद्यार्थी देवराज दिपक हगारे याने ३०० पैकी २७० गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत १३ वा व तालुका गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक मिळवला आहे.तसेच इ ६ वी ची विद्यार्थिनी श्रेया बलराज माने हिने ३०० पैकी २४४ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत १८ वी व तालुक्यात तिसरी आली आहे .तसेच इ ६ वी ची शुभांगी सतीश कुंभार या विद्यार्थीने २४0 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत २० वी तालुका यादीत ६ वी आली आहे. जिल्हा परिषद शाळा खानापूर चे माजी मुख्याध्यापक व इ ६ वी चे वर्गशिक्षक श्री .तानाजी ठोंबरे सर यांचे वर्गातील दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्याबद्दल मुख्याध्यापिका श्री. जयश्री गोपाळ सदामते यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच गुणवत्ता यादीत विदयार्थी आल्याबद्दल अमर जाधव सर व सोमनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले
सदसदविद्यार्थीनी जिल्हा परिषद शाळा खानापूर च्या नावलौकिकात भर टाकल्या बद्दल खानापूर केंद्राचे केंद्रप्रमुख सन्मानिय सुरेश संपतराव मंडले साहेब यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिंनंदन केले.तसेच जिल्हा परिषद शाळा खानापूर च्या शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा चारुशिला विकास भगत ,शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष श्री.बलराज माने व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सदर सर्व यशस्वी विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय जिल्हा परिषद सांगली यांनी घेतला असून सर्व गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यां जिल्हा परिषद शाळेत असतील त्या विद्यार्थ्याना जिल्हा परिषद सांगली कडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
सदर विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका जयश्री गोपाळ सदामते मँँडम ,तानाजी ठोंबरे सर ,किरण शिवशरण सर ,शोभा तांदळे मँँडम ,विजया घुतुगडे मँँडम,रंजना भंडारे मँँडम,अमर जाधव सर ,सारिका जाधव मँँडम ,ललिता ढाकरे मँँडम,माया पाटील मँँडम,सोमनाथ शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले .
Friday 6 October 2023
खानापूर तालुकास्तरीय शैक्षणिक साहित्य स्पर्धेत सदानंद रोकडे,सोमनाथ शिंदे,खलील मुल्ला प्रथम तर स्वाती पवार, निलेश टकले, अमोल आळंगे व्दितीय.
दिनांक ०६-१०-२०२३ रोजी खानापूर तालुक्यातील शैक्षणिक साहित्य स्पर्धा अमर रमेश कोष्टी प्राथमिक शाळा विटा येथे पार पडल्या .सदर शैक्षणिक साहित्य स्पर्धेत द्विशिक्षिकी गटामध्ये श्री सदानंद रोकडे सर यांचा प्रथम ,तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक साहित्य स्पर्धेत सोमनाथ मुरलीधर शिंदे सर यांचा प्रथम ,तर बहुशिक्षिकी शाळा गटामध्ये खलील मुल्ला सर यांचा प्रथम क्रमांक आला . द्विशिक्षिकी गटामध्ये स्वाती नामदेव पवार मँँडम,बहुशिक्षिकी गटामध्ये निलेश टकले सर यांचा व तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक साहित्य स्पर्धेत अमोल आळगे सर यांचा द्वितीय क्रमांक आला.खानापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी साहेब श्री. विकास राजे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली पार पाडलेल्या या शैक्षणिक साहित्य स्पर्धेस सन्मानिय केंद्रप्रमुख श्री.दिलीप सानप साहेब ,सन्मानिय केंद्रप्रमुख श्री.सुरेश मंडले साहेब .सन्मानिय केंद्रप्रमुख यलमार मँँडम यांची उपस्थिती लाभली.
Monday 2 October 2023
जिल्हा परिषद शाळा खानापूर मध्ये गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी .
आज दिनांक ०२-१०-२०२३ रोजी जिल्हा परिषद शाळा खानापूर मध्ये महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जयश्री गोपाळ सदामते यांनी श्रीफळ व पुष्प अर्पण केले. पदविधर शिक्षक श्री.तानाजी ठोंबर सर यांनी स्वागत व प्रास्ताविक सूत्रसंचालन केले. श्री. अमर जाधव सर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास श्रीम.शोभा तांदळे मॅडम, विजया घुटुगडे मॅडम, रंजना भंडारे मॅडम, ललिता खुपसे मॅडम, माया पाटिल मॅडम, वैशाली शिंदे मॅडम व श्रुती धेंडे मॅडम व पालक उपस्थित होते.
महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त शाळा व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य श्री अजित दळवी यांनी लायन क्लब च्या वतीने वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
🌼💫 ✨ *वक्तृत्व स्पर्धा*✨💫🌼
🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤
❄️🍀 *लायन्स क्लब खानापूर आयोजित वक्तृत्व स्पर्धा*🍀❄️
🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙
जिल्हा परिषद शाळा खानापूर च्या इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की;
*दिनांक*
0️⃣4️⃣-🔟-2️⃣0️⃣2️⃣3️⃣
*वार*- *बुधवार* रोजी
⚪ *ठिकाण* ⚪
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
*जिल्हा परिषद शाळा खानापूर खालची शाळा येथे*
🎈 *वेळ- सकाळी11.30 वाजता* 🎈
लायन्स क्लब खानापूर यांचे तर्फे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
🌴🌴☘️ *स्पर्धेचे विषय* ☘️🌴🌴
*1) स्वच्छतेचे महत्व*
*2) झाडांचे महत्त्व*
*3)माझी शाळा*
*4)आपला राष्ट्रध्वज*
*5)माझे स्वच्छ सुंदर गाव*
*6) माझे आवडते नेते*
याविषयावर आधारित वक्तृत्व स्पर्धा होतील.
🏆🏆🏆 🏆 *बक्षिसे* 🏆🏆🏆🏆
🥇 *प्रथम क्रमांक-२५१ रुपये*🥇
🥈 *व्दितीय क्रमांक -२०१ रुपये*🥈
🥉 *तृतीय क्रमांक -१ ५१रुपये* 🥉
याप्रमाणे बक्षिसे देण्यात येतील.
तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी स्पर्धेत सहभागी व्हावे.
*मुख्याध्यापक*
*जिल्हा परिषद शाळा खानापूर*
🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅