दिनांक ०६-१०-२०२३ रोजी खानापूर तालुक्यातील शैक्षणिक साहित्य स्पर्धा अमर रमेश कोष्टी प्राथमिक शाळा विटा येथे पार पडल्या .सदर शैक्षणिक साहित्य स्पर्धेत द्विशिक्षिकी गटामध्ये श्री सदानंद रोकडे सर यांचा प्रथम ,तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक साहित्य स्पर्धेत सोमनाथ मुरलीधर शिंदे सर यांचा प्रथम ,तर बहुशिक्षिकी शाळा गटामध्ये खलील मुल्ला सर यांचा प्रथम क्रमांक आला . द्विशिक्षिकी गटामध्ये स्वाती नामदेव पवार मँँडम,बहुशिक्षिकी गटामध्ये निलेश टकले सर यांचा व तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक साहित्य स्पर्धेत अमोल आळगे सर यांचा द्वितीय क्रमांक आला.खानापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी साहेब श्री. विकास राजे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली पार पाडलेल्या या शैक्षणिक साहित्य स्पर्धेस सन्मानिय केंद्रप्रमुख श्री.दिलीप सानप साहेब ,सन्मानिय केंद्रप्रमुख श्री.सुरेश मंडले साहेब .सन्मानिय केंद्रप्रमुख यलमार मँँडम यांची उपस्थिती लाभली.
सदर शैक्षणिक साहित्य स्पर्धेचे परिक्षण माहुली डी. एड कॉलेज चे प्राध्यापक श्री. भगवान वाजे सर, चोथे एस. डी. मॅडम व सुतार एस डी मॅडम यांनी केले.
तालुकास्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
*बहुशिक्षकी*
1)खलील रज्जाक मुल्ला (नागेवाडी) --प्रथम क्रमांक
2) निलेश रमेश टकले (वेजेगाव )- द्वितीय क्रमांक
3) सौ सुप्रिया महेंद्र सूर्यवंशी (भाळवणी) -तृतीय क्रमांक
4) सौ संतोषी धनाजी साळुंखे (आळसंद)उत्तेजनार्थ प्रथम
5) शिल्पा अनिल वडगावकर (चिखलहोळ) उत्तेजनार्थ द्वितीय
6) नवनाथ मधुकर सगरे (ढवळेश्वर )उत्तेजनार्थ तृतीय
*तंत्रज्ञानावर आधारीत साहित्य*
1) सोमनाथ मुरलीधर शिंदे खानापूर प्रथम क्रमांक
2) अमोल मधुकर आळंगे (पांगे मळा) द्वितीय क्रमांक
3) प्रियांका संजय निकम (गोडाचीवाडी) तृतीय क्रमांक
4) जावेद रफिक मनेरी ₹कुसबावडे )उत्तेजनार्थ प्रथम
*द्विशिक्षकी*
1) सदानंद मुकुंद रोकडे (साळशिंगे )प्रथम क्रमांक
2) स्वाती नामदेव पवार (अग्रणी मळा )द्वितीय क्रमांक
3) ऋषिकेश रामचंद्र महाले (एकेरी मळा)तृतीय क्रमांक
4) किशोर बापू चौरे ताडाचीवाडी उत्तेजनार्थ प्रथम
5) संभाजी रामचंद्र चव्हाण गोडाची वाडी उत्तेजनार्थ द्वितीय
स्पर्धेचे नियोजन सौ.सुप्रिया महाडिक मँँडम ,संगीता गुरव मँँडम व शुभांगी जानकर मॅडम यांनी केले. सन्मानिय सानप साहेब व मा.श्री .भगवान वाजे सर यांनी निकाल घोषित करून जिल्हा स्तारिय स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले. सन्मानिय गटशिक्षणाधिकारी
विकास राजे साहेब यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.









No comments:
Post a Comment