सोमनाथ शिंदे गुरुजी
जिल्हा परिषद शाळा खानापूर ता खानापूर, जिल्हा सांगली
Monday, 20 April 2026
Saturday, 21 March 2026
लेंगरे केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व पारितोषिक वितरण सोहळा 2025-26 दिमाखात साजरा.
Friday, 15 August 2025
जिल्हा परिषद शाळा मादळमुठी मध्ये स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिम्मित गुणवंत विद्यार्थी सत्कार व कवायत संचलन
आज १५ ऑगस्ट निमित्त ग्रामपंचायत मादळमुठी ,सर्व सेवा सोसायटी व जिल्हा परिषद शाळा मादळमुठी येथे ध्वजारोहन मोठ्या दिमाखात पार पडला . जिल्हा परिषद शाळा मादळमुठी मध्ये आज स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिम्मित कै.मारुती राजाराम सावंत यांच्या स्मरणार्थ सदाशिव राजाराम सावंत ,विकास मारुती सावंत व महादेव मारुती सावंत यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न झाला .इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .स्वयंम अमोल चिंचणकर , समृद्धी सुनील यादव,तपस्या तुकाराम बेंजारपे या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत नंबर आल्याबद्दल सत्कार करण्यात आला .याच प्रमाणे मंथन परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .
तसेच सन्मानिय किसान गोपाळा सावंत यांनी कै.गोपाळा राऊ सावंत यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद शाळा मादळमुठी शाळेस उर्वरित सर्व व्हरांडा रंगकाम ,गेट ,कंपाऊड रंगकाम करून देण्याचे जाहीर केले .शाळेचे मुख्याध्यापक श्री कादर आत्तार सर यांनी त्याचा सत्कार केला .
मादळमुठी गावाचे सरपंच सन्मानिय केदारी नामदेव भारते व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र भारते यांनी सर्व विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना नाष्टा दिला तसेच शाळेच्या विकासात सर्व सहकार्य करण्याचे जाहीर केले .
कार्यक्रमाच्या सुरवातीला विद्यार्थ्यांनी कवायत संचालन केले .मोठ्या उत्सहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला .
कार्यक्रम प्रसंगी मादळमुठी गावचे सरपंच ,उपसरपंच ,माजी सरपंच ,माजी उपसरपंच ,पोलीस पाटील ,ग्रामपंचायत सदस्य ,माजी ग्रामपंचायत सदस्य ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य ,सर्व सेवा सोसायटी चेअरमन ,व्हाईस चेअरमन संचालक सर्व अंगणवाडी सेविका व कार्यकर्त्या सर्व शिक्षक वर्ग व पालक उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिन सोहळा २०२५ ची क्षणचित्रे
Friday, 31 January 2025
सेम क्रॉप ग्रीन इन्फ्रा लिमिटेड कंपनीमार्फत जि. प. शाळा मादळमुठी शाळेस दहा लाख रुपयांची प्रयोगशाळा मंजूर .
जिल्हा परिषद शाळा मादळमुठी शाळेस सेम क्रॉप ग्रीन इन्फ्रा लिमिटेड या कंपनी मार्फत दहा लाख रुपयाची प्रयोगशाळा मंजूर झाली असून त्या निम्मित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मादळमुठी या ठिकाणी रस्ते सुरक्षा व जागरूकता या विषयावर व्याख्यान आयोजित केले गेले होते. सेम क्रॉप ग्रीन इन्फ्रा लिमिटेड या कंपनीचे सेफ्टी मॅनेजर माननीय संभाजी वडाम यांचे रस्ते सुरक्षितता व जागरूकता या विषयावरती व्याख्यान झाले. रस्त्यावरून जात असताना वाहतुकीचे नियम पाळणे, हेल्मेट वापरणे, सिट बेल्ट वापरणे या संबंधी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कंपनीचे साईट मॅनेजर मनोज माळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रम पुर्वी सेम क्रॉप ग्रीन इन्फ्रा लिमिटेड कंपनी तर्फे शाळेला प्रयोग शाळेचे साहित्य प्रदान करण्यात आले.लवकर जिल्हा परिषद शाळा मादळमुठी शाळेला सुसज्ज प्रयोगशाळा पूर्ण होईल त्याचा परिसरातील सर्व शाळांना होईल.अशी माहिती सन्मानिय वडाम साहेबांनी दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक माननीय कादर अत्तार सर हे होते. कार्यक्रमास मा. मनोज माळी, मा. भाऊसाहेब देशमुख, मा.कृष्णा अंबिकर, मा.वैभव कवडे, मा. दत्तात्रय चव्हाण साहेब, पदवीधर शिक्षक अशोक घाडगे सर, सुप्रिया चोथे मॅडम, श्री सोमनाथ शिंदे सर, मिनाक्षी बेंजारपे मॅडम, महेश यादव सर उपस्थित होते.
Wednesday, 25 December 2024
केंद्रस्तरिय क्रिडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा मादळमुठी शाळेला मोठया गटात जनरल चॅम्पियनशिप.
खालील क्रिडा प्रकरा मध्ये बाजी मारून जिल्हा परिषद शाळा मादळमुठी शाळा अव्वल ठरली आहे.
१)कब्बडी मोठा गट मुले प्रथम क्रमांक
२) कब्बडी मोठा गट मुली प्रथम क्रमांक
३) खो खो मोठा गट मुले व्दितीय क्रमांक
४) खो खो मोठा गट मुली व्दितीय क्रमांक.
५) रिले मोठा गट मुले प्रथम क्रमांक.
६) संघर्ष राजू कांबळे 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक.
७) आर्यन जगदीश पवार 400 मीटर तृतीय.
८) भाग्यलक्ष्मी राजू कांबळे ४00 मीटर तृतीय.
९) संघर्ष राजू कांबळे लांब उडी प्रथम.
१०) ओंकार अर्जुन भारते लांब उडी व्दितीय.
११) स्नेहल मच्छिंद्र माळी लांब उडी तृतीय.
१२) संघर्ष राजू कांबळे गोळा फेक प्रथम.
१३) सुयश प्रकाश भारते गोळा फेक व्दितीय.
१४) श्वेता बापूराव माळी गोळा फेक तृतीय.
१५) खो खो लहान गट मुले व्दितीय.
१६) खो खो लहान गट मुली व्दितीय.
या प्रमाणे १६ बक्षिसे मिळवून मादळमूठी शाळा केंद्रस्तरिय क्रिडा स्पर्धेत जनरल चॅम्पियन ठरली आहे.
मुलांना जिल्हा परिषद शाळा मादळमुठी शाळेचे मुख्याध्यापक श्री कादर अत्तार सर, श्री अशोक घाडगे सर, सौ.सुप्रिया चोथे मॅडम,श्री. सोमनाथ शिंदे सर, मिनाक्षी बेंजरपे मॅडम व महेश यादव सर यांचे मार्गदर्शन लाभले.
केंद्रस्तरिय क्रिडा स्पर्धेतील क्षणचित्रे.
Friday, 25 October 2024
Saturday, 19 October 2024
Wednesday, 16 October 2024
जिल्हा परिषद शाळा मादळमुठी येथे वाचन प्रेरणा दिन साजरा.


.jpg)

















.jpeg)
.jpeg)


.jpeg)



.jpeg)





















