सोमनाथ शिंदे गुरुजी ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत

Showing posts with label केंद्रस्तरिय क्रिडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा मादळमुठी शाळेला मोठया गटात जनरल चॅम्पियनशिप.. Show all posts
Showing posts with label केंद्रस्तरिय क्रिडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा मादळमुठी शाळेला मोठया गटात जनरल चॅम्पियनशिप.. Show all posts

Wednesday, 25 December 2024

केंद्रस्तरिय क्रिडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा मादळमुठी शाळेला मोठया गटात जनरल चॅम्पियनशिप.


केंद्रस्तरिय क्रिडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा मादळमुठी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा प्रकारात घवघवीत यश संपादन केले आहे. लेंगरे केंद्रातील झालेली कब्बडी, खो खो, रिले, लांब उडी, गोळा फेक, धावणे या विविध क्रीडा प्रकारात अव्वल यश मिळवत जिल्हा परिषद शाळा मादळमुठी शाळेतील विद्यार्थ्यांनी यावर्षी क्रिडा स्पर्धेत बाजी मारली आहे. क्रिडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा लेंगरे, जिल्हा परिषद शाळा देविखींडी, जिल्हा परिषद शाळा भूड, जिल्हा परिषद शाळा इंदिरा आवास, जिल्हा परिषद शाळा गुजलेवस्ती, जिल्हा परिषद शाळा वाळूज, जिल्हा परिषद शाळा बोबडेवाडी, जिल्हा परिषद शाळा कांडेसरवाडी, जिल्हा परिषद शाळा शिवेचामळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा लेंगरे 

खालील क्रिडा प्रकरा मध्ये बाजी मारून जिल्हा परिषद शाळा मादळमुठी शाळा अव्वल ठरली आहे.

१)कब्बडी मोठा गट मुले प्रथम क्रमांक 

२) कब्बडी मोठा गट मुली प्रथम क्रमांक 

३) खो खो मोठा गट मुले व्दितीय क्रमांक 

४) खो खो मोठा गट मुली व्दितीय क्रमांक.

५) रिले मोठा गट मुले प्रथम क्रमांक.

६) संघर्ष राजू कांबळे 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक.

७) आर्यन जगदीश पवार 400 मीटर तृतीय.

८) भाग्यलक्ष्मी राजू कांबळे ४00 मीटर तृतीय.

९) संघर्ष राजू कांबळे लांब उडी प्रथम.

१०) ओंकार अर्जुन भारते लांब उडी व्दितीय.

११) स्नेहल मच्छिंद्र माळी लांब उडी तृतीय.

१२) संघर्ष राजू कांबळे गोळा फेक प्रथम.

१३) सुयश प्रकाश भारते गोळा फेक व्दितीय.

१४) श्वेता बापूराव माळी गोळा फेक तृतीय.

१५) खो खो लहान गट मुले व्दितीय.

१६) खो खो लहान गट मुली व्दितीय.

या प्रमाणे १६ बक्षिसे मिळवून मादळमूठी शाळा केंद्रस्तरिय क्रिडा स्पर्धेत जनरल चॅम्पियन ठरली आहे.

     मुलांना जिल्हा परिषद शाळा मादळमुठी शाळेचे मुख्याध्यापक श्री कादर अत्तार सर, श्री अशोक घाडगे सर, सौ.सुप्रिया चोथे मॅडम,श्री. सोमनाथ शिंदे सर, मिनाक्षी बेंजरपे मॅडम व महेश यादव सर यांचे मार्गदर्शन लाभले.

केंद्रस्तरिय क्रिडा स्पर्धेतील क्षणचित्रे.