सोमनाथ शिंदे गुरुजी ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत

Thursday, 2 July 2026

जिल्हा परिषद शाळा इंदिरा आवास शाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष

 



🚩🎈*जिल्हा परिषद शाळा इंदिरा आवास शाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष* 🎈🚩

✨✨✨✨✨✨✨


*आज दिनांक 02/07/2026 रोजी जिल्हा परिषद शाळा इंदिरा आवास शाळेला 25 वर्ष पूर्ण झाली. दिनांक 02/07/2001 रोजी एका छोट्याशा

खोलीमध्ये 18 विद्यार्थी वर  लेंगरे ग्रामस्थांच्या सहकाऱ्याने स्थापन झालेल्या इंदिरा आवास शाळेचे आज मोठा वटवृक्ष झाला आहे. या शाळेच्या स्थापने पासून* *सोयबमहमद मुस्तफा अत्तार सर यांनी अनेक* *अडचणीवर मात करत. या शाळेला मोठी उभारी दिली आहेत. मोठ्या संकटातून* *उभारलेल्या या शाळेने गावाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे.* *खऱ्या अर्थाने वंचितांच्या शिक्षणासाठी मोलाचे योगदान या शाळेने दिले आहे.* *सामाजिकदृष्ट्या मागे असणाऱ्या व शिक्षणापासून वंचित असणाऱ्या  लेंगरे* *गावाच्या या वस्तीतील  शाळेने गोरगरीबांच्या शिक्षणाची दारे खुली केली आहेत.* 

   *या शाळेमध्ये अनेक चांगले विद्यार्थी घडले. गेल्या 25 वर्षात या शाळेचे अनेक विद्यार्थी डॉक्टर इंजिनिअर झाले आहेत. तसेच शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षांमध्ये अनेक* *मुलांनी चांगले यश मिळविले आहे. आज ही शाळा खानापूर तालुक्यातील एक नावाजलेली शाळा म्हणून पुढे येत आहे. परसबाग स्पर्धेत खानापूर* *तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त असणारी ही शाळा शिक्षण क्षेत्रात अत्यंत चांगले योगदान देऊन* *वंचितांच्या शिक्षणाचा कल्पवृक्ष म्हणून पुढे येत आहे. या शाळेचे मुख्याध्यापक  श्री. संजय कांबळे सर व सहशिक्षिका शाकिरा कादर अत्तार मॅडम या *अनुभवी उपक्रमशील शिक्षकांच्या मेहनतीच्या जीवावर  या शाळेला भविष्यात ही प्रचंड यश लाभो. वंचितांच्या शिक्षणाचा मुकूटमणी* *असणाऱ्या या शाळेच्या भावी देदीप्यमान वाटचालीस लेंगरे ग्रामस्थांकडून आजच्या रौप्य महोत्सवा निम्मित भरभरून शुभेच्छा.*





Saturday, 21 March 2026

लेंगरे केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व पारितोषिक वितरण सोहळा 2025-26 दिमाखात साजरा.


आज दिनांक 20/03/2026 रोजी रामकृष्णाई मंगल कार्यालय लेंगरे येथे लेंगरे केंद्रातील सर्व शाळांचा पारितोषक वितरण व विविध गुणदर्शन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. खानापूर पंचायत समिती सभापती सौ. सुवर्णाताई भोसले मॅडम, उपसभापती सुहास नाना शिंदे, जिल्हा परिषद सदस्या मनिषाताई प्रकाश बागल, गटविकास अधिकारी सन्मानीय डॉ. संताजी पाटील साहेब, पंचायत समिती सदस्या पायलताई निवास कदम, पंचायत समिती सदस्या प्रतिभाताई सुरेश शेंडे मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय मोरे साहेब, प्रशांत भोसले साहेब ,लेंगरे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. दिलीपकुमार सानप साहेब,मादळमुठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा धनश्री निकम मॅडम, देवीखिंडी गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री प्रकाश निकम साहेब, थोर देणगीदार अनिल माने साहेब श्री.ओंकार पाटिल यांचे उपस्थित शिक्षक बँकेचे संचालक व देवीखिंडी शाळेचे मुख्याध्यापक श्री धनाजी बाबू घाडगे व वरिष्ठ मुख्याध्यापक कादर सिकंदर अत्तार यांच्या देणगीतून मोठ्या दिमाखात पार पडला.
  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लेंगरे केंद्राचे केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. लहान गटातील जनरल चॅम्पियनशिप जिल्हा परिषद शाळा लेंगरे शाळेला तर मोठ्या गटातील जनरल चॅम्पियनशिप जिल्हा परिषद शाळा मादळमुठी शाळेला मिळाली. तसेच सर्वसाधारण जनरल चॅम्पियनशिप जिल्हा परिषद शाळा मादळमुठी शाळेला मिळाली.
                        सन्मानीय गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील साहेब यांनी लेंगरे केंद्राचे कामकाज आदर्शवत असल्याचे कौतुकउदगार काढले. तसेच लेंगरे केंद्रातील सर्व शिक्षकांनी अतिशय अनोख्या पद्धतीने सुंदर अश्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल कौतुक केले. सौ.मनिषाताई बागल यांनी लेंगरे केंद्रातील सर्व शाळांचे काम आदर्शवत असून भविष्यात जिल्हा परिषद शाळांच्या विकासासाठी सर्व मदत करण्याचे जाहीर केले.
    खानापूर पंचायत समिती सभापती सुवर्णाताई प्रशांत भोसले यांनी खानापूर तालुक्यातील शिक्षण विभाग चांगले काम करत असून भविष्यात सर्व जिल्हा परिषद शाळांचा पट व गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करू व जिल्हा परिषद शाळांच्या विकासाठी नेहमी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. प्रतिभाताई सुरेश शेंडे मॅडम नी पारितोषिक विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुलांनी भविष्यात चांगले यश मिळवावे अशा सदिच्छा दिल्या.
   सन्मानीय दिलीपकुमार सानप साहेब यांनी प्रास्ताविक केले प्रास्ताविकाच्या झंझावती भाषणात साहेबांनी लेंगरे केंद्राच्या प्रगतीचा आढावा मांडला.  शिक्षकांना व विद्यार्थ्यांना प्रेरणात्मक भाषणात साहेबांनी जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेत सदैव अग्रेसर राहतील याची ग्वाही दिली.
               बक्षिस वितरण सोहळ्यानंतर दिमाखदार विविध गुणदर्शन सोहळा पार पडला.लेंगरे केंद्रातील लेंगरे, देवीखिंडी, भूड,मादळमुठी, वाळूज, कांडेसरवाडी , बोबडेवाडी, इंदिरा आवास, लेंगरे उर्दू, गुजलेवस्ती, शिवेचा मळा या शाळांनी छान प्रदर्शन केले.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व youtube Live चित्रण श्री. सोमनाथ शिंदे जिल्हा परिषद शाळा मादळमुठी यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार महंमदशफी पटेल मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा लेंगरे यांनी केले.

 कार्यक्रमाचे देखणे नियोजन श्री महामदशफी पटेल सर अध्यक्ष क्रिडा व सांस्कृतिक समिती यांनी केले. त्यांना श्री. संजय कांबळे सर, धनाजी घाडगे सर, श्री. निशिकांत आयवळे सर, अशोक घाडगे सर, धनंजय कवडे सर, संपतराव तामखडे सर, जि. प.शाळा बोबडेवाडी चे मुख्याध्यापक खिलारे सर, संपतराव निकम सर, अजयकुमार क्षीरसागर व जि. प. उर्दू शाळेचे मुख्याध्यापक यांचे सहकार्य लाभले सन्मानीय बाळासाहेब जावीर सर व शाहनवाज मणेर सर यांचीही या सोहळ्याला उपस्थित लाभली.
  

कार्यक्रमातील क्षणचित्रे 
Live कार्यक्रमाची YouTube Link