🚩🎈*जिल्हा परिषद शाळा इंदिरा आवास शाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष* 🎈🚩
✨✨✨✨✨✨✨
*आज दिनांक 02/07/2026 रोजी जिल्हा परिषद शाळा इंदिरा आवास शाळेला 25 वर्ष पूर्ण झाली. दिनांक 02/07/2001 रोजी एका छोट्याशा
खोलीमध्ये 18 विद्यार्थी वर लेंगरे ग्रामस्थांच्या सहकाऱ्याने स्थापन झालेल्या इंदिरा आवास शाळेचे आज मोठा वटवृक्ष झाला आहे. या शाळेच्या स्थापने पासून* *सोयबमहमद मुस्तफा अत्तार सर यांनी अनेक* *अडचणीवर मात करत. या शाळेला मोठी उभारी दिली आहेत. मोठ्या संकटातून* *उभारलेल्या या शाळेने गावाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे.* *खऱ्या अर्थाने वंचितांच्या शिक्षणासाठी मोलाचे योगदान या शाळेने दिले आहे.* *सामाजिकदृष्ट्या मागे असणाऱ्या व शिक्षणापासून वंचित असणाऱ्या लेंगरे* *गावाच्या या वस्तीतील शाळेने गोरगरीबांच्या शिक्षणाची दारे खुली केली आहेत.*
*या शाळेमध्ये अनेक चांगले विद्यार्थी घडले. गेल्या 25 वर्षात या शाळेचे अनेक विद्यार्थी डॉक्टर इंजिनिअर झाले आहेत. तसेच शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षांमध्ये अनेक* *मुलांनी चांगले यश मिळविले आहे. आज ही शाळा खानापूर तालुक्यातील एक नावाजलेली शाळा म्हणून पुढे येत आहे. परसबाग स्पर्धेत खानापूर* *तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त असणारी ही शाळा शिक्षण क्षेत्रात अत्यंत चांगले योगदान देऊन* *वंचितांच्या शिक्षणाचा कल्पवृक्ष म्हणून पुढे येत आहे. या शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय कांबळे सर व सहशिक्षिका शाकिरा कादर अत्तार मॅडम या *अनुभवी उपक्रमशील शिक्षकांच्या मेहनतीच्या जीवावर या शाळेला भविष्यात ही प्रचंड यश लाभो. वंचितांच्या शिक्षणाचा मुकूटमणी* *असणाऱ्या या शाळेच्या भावी देदीप्यमान वाटचालीस लेंगरे ग्रामस्थांकडून आजच्या रौप्य महोत्सवा निम्मित भरभरून शुभेच्छा.*



