जिल्हा स्तरावर शैक्षणिक साहित्य स्पर्धेतील विजेते शिक्षकांनी खालील लिंक वर माहिती भरावी .
Friday 25 October 2024
Saturday 19 October 2024
Wednesday 16 October 2024
जिल्हा परिषद शाळा मादळमुठी येथे वाचन प्रेरणा दिन साजरा.
Saturday 10 August 2024
जिल्हा परिषद शाळा मादळमुठीचे माजी विद्यार्थी बाबुराव यशवंत भगत व सत्यवान यशवंत भगत यांचे कडून शाळेस संगणक संच भेट ,तर महादेव मारुती सावंत यांचेकडून गुणवंत विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य व ट्रॉफी बक्षीस .
जिल्हा परिषद शाळा मादळमुठी शाळेचे माजी विद्यार्थी बाबुराव यशवंत भगत.व सत्यवान यशवंत भगत यांचे कडून १५ ऑगस्ट निमित्त शाळेस संगणक संच भेट देण्याची घोषण केली . ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शाळेची गरज ओळखून शाळेला संगणक भेट देण्याचा निर्णय बाबुराव व सत्यवान भगत यांनी घेतला.
तसेच सदाशिव राजाराम सावंत, महादेव मारुती सावंत , विकास मारूती सावंत यांनी कै.मारुती राजाराम सावंत (माजी सरपंच मादळमुठी) यांचे स्मरणार्थ १५ ऑगस्ट रोजी इ १ ली ते ८ वी पर्यतच्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना ट्रॉफी व शैक्षणिक साहित्य देण्याची घोषणा केली. कै. मारूती राजाराम सावंत (माजी सरपंच मादळमुठी) यांनी मादळमुठी गावाच्या शैक्षणिक, सामाजिक विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचा कार्याचा वसा सावंत कुटुंबियांकडून पुढे चालू ठेवला आहे.
संगणकसंच प्रदान कार्यक्रम व गुणवंत विद्यार्थांना बक्षीस वितरण सोहळा १५ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा परिषद शाळा मादळमुठी येथे होणार आहे.
जिल्हा परिषद शाळा मादळमुठी शाळेचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत .तर मादळमुठी शाळेचे अनेक विद्यार्थी गलाई व्यवसाया निम्मित भारताच्या विविध भागात आहेत .परंतू आपल्या गावाशी नाळ जोडलेल्या गलाई बांधवांनी शाळेच्या प्रगती साठी नेहमीच सहकार्य केले आहे.जिल्हा परिषद शाळा मादळमुठी शाळेचे मुख्याध्यापक सन्मानिय कादर आतार सर यांनी सर्व देणागीदाराचे सहकार्या बद्दल आभार मानले. .
Wednesday 31 July 2024
Sunday 12 May 2024
माजी विद्यार्थी शिक्षक स्नेहमेळावा निम्मित १५ मे रोजी शिक्षक सन्मान रँली चे आयोजन .
समाजातील शिक्षकांच्या कार्याला सलाम करण्यासाठी एक आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे . शिक्षक सन्मान रँलीचे आयोजन समाजाचे शिक्षक प्रती असणारा आदरभाव व्यक्त करण्यासाठी केले असून सदर रँली मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री.आशिष कोले, श्री.सोमनाथ शिंदे सर, सचिन जाधव सर, श्रीकांत मोहिते, गणेश पवार, जितेंद्र शिंदे व १९९९ च्या बँच कडून केले आहे .
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा नियोजन खालीलप्रमाणे