Wednesday, 14 September 2022
Friday, 2 September 2022
जॉली बोर्ड कंपनी तर्फे जिल्हा परिषद शाळा खानापूर शाळेस ११ पिन बोर्ड भेट.
आज दिनांक ०२/०९/२०२२ रोजी जॉली बोर्ड कंपनी लिमिटेड सांगली चे व्यवस्थापक श्री.अमोल शिंदे साहेब यांनी जिल्हा परिषद शाळा खानापूर शाळेस भेट देवून जॉली बोर्ड कंपनी तर्फे ११ पिन बोर्ड शाळेस भेट देण्यात आले.जिल्हा परिषद शाळा खानापूरच्या सर्व वर्गास पिन बोर्ड भेट देण्यात आले.जिल्हा परिषद शाळा खानापूर चे मुख्याध्यापक श्री.तानाजी ठोंबरे सर यांच्या मागणी नंतर एका दिवसात जॉली बोर्ड कंपनी लिमिटेड सांगली चे व्यवस्थापक श्री.अमोल शिंदे साहेब यांनी शाळेस भेट देवून पिन बोर्ड भेट देण्यात आले.लेंगरे येथील सन्मानिय श्री मोहन शिंदे गुरुजी यांचे चिरंजीव असलेले सन्मानिय श्री अमोल शिंदे साहेब यांनी शिक्षण क्षेत्राशी असणारे जिव्हाळ्याचे नाते जपत जिल्हा परिषद शाळांना पिन बोर्ड भेट देवून शिक्षण क्षेत्राशी आपुलकी जपली आहे .शाळेचे मुख्याध्यापक श्री तानाजी ठोंबरे सर यांनी श्री.अमोल शिंदे साहेब यांचे सहर्ष स्वागत केले.श्री.अमर जाधव सर यांनी जॉली बोर्ड कंपनीचे शाळेच्या वतीने सहर्ष असे आभार मानले.कार्यक्रमास शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री.तानाजी ठोंबरे सर ,जॉली बोर्ड कंपनी लिमिटेड सांगली चे व्यवस्थापक श्री.अमोल शिंदे साहेब,श्री अमर जाधव सर , श्रीम.शोभा तांदळे मँँडम,सौ.रंजना भंडारे मँँडम व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
जॉली बोर्ड कंपनीचे जिल्हा परिषद शाळा खानापूर कडून खूप खूप आभार.
Saturday, 2 April 2022
लेंगरे गावचा 'उरुस' ... म्हणजे ग्रामीण संस्कृतीचे देखणे रूप
गुढीपाडव्याच्या बरोबर आठव्या दिवशी लेंगरे गावाचा उरूस असतो.गुढीपाडव्याच्या दिवशी लेंगरे गावात बैलाच्या शिवळा असतात.कलंदर बाबाच्या टेकडीवर गावातील बैलांच्या शिवळा पळविल्या जातात.लेंगरे गावाच्या पंचक्रोशीतील लोक पाडव्याच्या शिवळा पाहण्यासाठी येतात व त्या दिवसापासून लेंगरेकराना व लेंगरे पंचक्रोशीतील लोकांना लेंगरे यात्रेची म्हणजे उरूसाची ओढ लागते.खानापूर तालुक्यातील मोठी यात्रा असल्यामुळे व बैलाच्या गाड्यांसाठी प्रसिद्ध असणारी यात्रा असल्यामुळे लोकांना यात्रेची ओढ अधिक असते.
लेंगरे गावाच्या बाहेर गेलेले अनेक गलाई बांधव ,नोकरी कामा निम्मित बाहेर गावी असणारे लोक आवर्जून लेंगरे यात्रेला उपस्थित रहातात. गुढीपाडव्यानंतर यात्रेचा बहर चालू होतो. यात्रेतील मानाचा समजला जाणारा गलफाचा मान सांगली जिल्हा परिषद चे माजी सदस्य खानापूर पंचायत समिती चे माजी सभापती स्वर्गीय जालिंदर(बापू)हरिबा शिंदे (पाटील) यांच्या घरात असतो .जालिंदर बापू हे सांगली जिल्ह्यातील शांत संयमी दिलदार व्यक्तिमत्व ,देवमाणूस म्हणून प्रसिद्ध होते .सध्या बापूचा मोठा मुलगा मच्छिंद्रनाथ जालिंदर शिंदे पाटील (आप्प्पा) यांचे कडे गलफाचा मान आहे.
तसेच मानाचा गाडा पळविण्याचा व पाहटेच्या मानाच्या गाड्याच्या मान खालची पाटील आळी श्री .श्रीरंग (आण्णा) शिंदे यांच्या भावाकीचा व लिंबाजी पाटलाच्या आळीचा मान आहे.तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती व सर्व समाजातील व्यक्तींना यात्रे मध्ये मान देवून सर्वांच्या सहकार्याने यात्रा मोठ्या दिमाखात पार पडली जाते. यात्रा कमिटी मध्ये श्री मधुकर पाटील (आप्पा) यांचे ही योगदान मोलाचे असते.
उरुसाचा पहिला दिवशी म्हणजे संदल दिवशी लेंगरे करांच्या अनेक जणाच्या घरी कंदुरी असते. गावातील यात्रेला येणाऱ्या पाहुण्यांना कंदूरी निमित मटण चारून स्वागत केले जाते. कलंदर बाबाचे नवस म्हणून संदल निमित्त बोकड कापून त्यांचा नैवद्य कलंदर बाबाला दाखविला जातो. फकीर जेवणासाठी बोलविले जातात.त्याच दिवशी सायंकाळी लेंगरे येथील प्रसिद्ध बँड पथक यांचा व भजनी मंडळ यांचा कार्यक्रम असतो . तसेच रात्री लोकनाट्य तमाशा असतो. ती रात्र लेंगरेकर जागून काढतात. यात्रेच्या मुख्य दिवशी पाहटे चार वाजता कलंदर बाबाला गलफ व चादर चाढविण्यासाठी गावातील सर्व लोक एकत्रीत जातात. गलफा समोर अतिशय रोमांचक असे विविध खेळ , धाडशी प्रकार केले जातात. कवाली गायली जाते . मोठ्या दिमाखाने कलंदर बाबांना चादर चाढवली जाते. गाण्याचे आवाज फुलांच्या चादरा,अगराबतीच्या वास व कलंदर बाबा की दोन चार हो धिंग च्या घोषाने लेंगरे पेठ दणाणून निघते.
गलफ व चादरच्या मागे मानाचे गाडे असतात. पहाटेचे मानाचे गाडे वाजत गाजत कलंदर बाबाच्या टेकडी वर जातात. व त्या ठिकाणी मोठ्या दिमाखात जोशात पळविले जातात. हजारो लेंगरे करांच्या डोळ्यांचे पारणे फिटले जाते. त्यानंतर यात्रेच्या मुख्य दिवशी कलंदर बाबा टेकडी वर दुपारी दोन पासून गाडे पाहण्यासाठी गर्दी होते. चार वाजे पर्यंत बैलांचे गाडे वाजत गाजत कलंदर बाबा टेकडी पर्यंत येतात. वर्षभर बैलांना चंदी चारून शेतकरी मेहनतीने बैलांची काळजी घेत असतात. त्या बैलांना वाजत गाजत टेकडी वर आणले जाते. कलंदर बाबा टेकडीवर गाडे मोठ्या दिमाखात जोशात आनंदात पळविले जातात. गाडा सरळ गेला की गाडा मालक एकदम खुश होतो. व आनंदाने आपला फेटा हवेत फेकतो. अन वर्षभर गाडा सरळ गेल्याची चर्चा गावभर चालु असते. यात्रेला लेंगरे पंचक्रोशीतील भुड ,माधळमुठी, वाळूज, देविखिंडी, व अनेक आसपासच्या गावातील लोकही आपली बैले कलंदर बाबाच्या टेकडीवर पळविण्यासाठी आणतात. अश्या प्रकारे यात्रेचा मुख्य दिवस पार पडतो. यात्रेला मुलांना अनेक खेळणी पाळणे व विविध विक्रेते याचे स्टाल असतात. त्यामुळे सर्व गाव फुलून निघते.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भव्य असे कुस्तीचे मैदान कलंदर बाबा कुस्ती आखाड्यात भरते. महाराष्ट्रातील अनेक मात्तबर मल्ल लेंगरेच्या कुस्ती आखाड्याला हजेरी लावतात. लेंगरे गावातील अनेक लोकांना कुस्तीची प्रचंड आवड आहे. श्री.प्रशांत सावंत , साहेबलाला शेख,प्रकाश कदम व त्यांचे सहकारी, कुस्तीची आवड असणारी मंडळी लेंगरे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतात. पारंपारिक कुस्ती, लाल मातीतली कुस्ती अजून लेंगरे गावाने जपली आहे. ग्रामीण भागाच्या संस्कृतीची जपणूक खऱ्या अर्थाने लेंगरे यात्रेमुळे होत आहे. तसेच यात्रेमध्ये विविध कला, भजन, पोवाडे, लोकनाट्य तमाशा, बैलांच्या शर्यती व लेंगरे कराकडून केला जाणारा पाहुणचार, हिंदू मुस्लिम ऐक्य हे भारतामधील ग्रामीण संस्कृतीचे जपण्याचे मोठे काम लेंगरे उरुसा मुळे होत आहे. ग्रामीण संस्कृतीचे देखणे रूप पाहायचे असेल तर लेंगरे उरुसाला नक्की या.
लेंगरे गावचा उरूस हा ग्रामीण संस्कृतीचे देखणे रूप आहे.
लाल शाहा बाज की दोन चार हो धींग !
श्री.सोमनाथ मुरलीधर शिंदे ( गुरुजी)
Tuesday, 8 March 2022
जागतिक महिलादिन निमित्त महिलांच्या सन्मानार्थ जिल्हा परिषद शाळा खानापूर मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन.
कर्तुत्वान महिला बद्दल विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केली. तसेच मुलांना कर्तुत्वान महिलांच्या बद्दल अधिक माहिती प्रोजेक्टर च्या साहाय्याने दाखविण्यात आली.
तसेच महिलांच्या सन्मानार्थ मुलींच्या व महिलांच्या संगीत खुर्ची चे आयोजन करण्यात आले. यामध्ये मुलांनी मुलींनी व शिक्षिकांनी आनंद घेतला.मुलींच्या संगीत खुर्ची स्पर्धेत १) नजहत पिरजादे इ २ री,२) बिबीआयेशा इ ३री ३) शौर्या इ १ ली ४) ऐश्वर्या इ ४थी या मुलींनी यश संपादन केले.
शिक्षिकांच्या संगीत खुर्ची स्पर्धेत सौ. माया पाटील मॅडम यांनी प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक रंजना भंडारे मॅडम यांनी मिळविला. तसेच वंदना बुचडे मॅडम, ललिता खूपसे मॅडम , रेखाताई ठोंबरे मॅडम, विजया घुटूगडे मॅडम, जयश्री तोडकर मॅडम, गावित मॅडम यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन जि. प. शाळा खानापूर चे मुख्याध्यापक श्री. तानाजी ठोंबरे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळा खानापुर चे ज्येष्ठ शिक्षक श्री.किरण शिवशरण सर व पदवीधर शिक्षक सन्मानिय श्री.दीपक शितोळे सर यांनी केले. आभार श्री. सोमनाथ शिंदे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यास सौ. शोभा तांदळे मॅडम व अमर जाधव सर , सारिका जाधव मॅडम यांचे सहकार्य लाभले तसेच खेडकर सर, सचिन माने सर ,बुचडे सर , शकील मुल्ला सर, शंकर भोसले सर (मुख्याध्यापक जि. प. शाळा बलवडी) श्री. फिरोज नदाफ सर यांचे उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
Saturday, 5 March 2022
खानापुर (विटा ) तालुका स्तर शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण उत्साहात संपन्न.
खानापूर तालुकास्तर शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण विटा न प शाळा नंबर २ मध्ये दिनांक ०४/०३/२०२२ ते ०५/०३/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आले.खानापुर तालुक्याच्या गटशिक्षणाधकारी श्रीमती अनुराधा म्हेत्रे मॅडम यांच्या मार्गदर्शना नुसार अतिशय उत्कृष्टरीत्या शाळा व्यवस्थापन सक्षमीकरण प्रशिक्षण संपन्न झाले. सदर प्रशिक्षणातून शाळा व्यवस्थापन समितीची रचना कार्य जबाबदारी ; गुणवत्ता पूर्ण शिक्षणात शाळा व्यवस्थापन समितीचे योगदान; निपुण भारत अभियान , बालकांचे हकक व सुरक्षितता, शालेय आपत्ती व्यवस्थापन, शालेय आर्थिक व्यवस्थापन , शालेय विकास आराखडा, शाळेचे सामाजिक अंकेक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.प्रशिक्षणात सर्व शिक्षकांनी छान गटकार्य सादर केले. तज्ञ मार्गदर्शक म्हणून सन्मानिय खानापुर , पळशी, रेणावी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. सुरेश मंडले साहेब, जिल्हा परिषद शाळा खानापूरचे सहशिक्षक श्री. सोमनाथ शिंदे सर , तसेच खानापूर तालुका स्तरीय समन्वयक व मार्गदर्शक खानापूर पं.स विषयतज्ञ सौ. निर्मला यादव मॅडम यांनी छान मार्गदर्शन केले.
तसेच सन्मानिय केंद्रप्रमुख श्री.सानप साहेब , जिल्हा स्तरीय मार्गदर्शक श्री. कुंभार सर, श्री.कोळेकर सर, तसेच श्री लवळे सर यांनी प्रशिक्षणाला भेट देवून मार्गदर्शन केले.
खानापूर पंचायत समिती च्या वतीने उत्तम जेवणाचे व चहापानाचे व्यवस्था करण्यात आली व न. प शाळा नंबर दोन चे मुख्याध्यापक श्री. पाटिल सर यांनी प्रशिक्षण साठी हॉल व प्रोजेक्टर उपलब्ध करून देवून प्रशिक्षणासाठी मोठे सहकार्य केले.
शाळा व्यवस्थापन समिती सक्षमकरण प्रशिक्षणातील क्षणचित्रे
पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
प्रशिक्षण अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Monday, 28 February 2022
छोट्या छोट्या आनंदायी प्रयोगाच्या माध्यमातून जि.प .शाळा खानापूरच्या चिमुकल्यांनी साजरा केला राष्ट्रीय विज्ञान दिन .
आज २८ फेब्रुवारी रोजी सर सी व्ही रामण यांच्या रामन परिणाम या संशोधन या कार्याबद्दल त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या अनुषगाने देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो .त्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळा खानापूर च्या लहान लहान १ ली ते ७ वी च्या चिमुकल्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोगशाळेला भेट देवून.छोटे छोटे आनंदायी प्रयोग पाहिले .तसेच छोटे छोटे प्रयोग स्वता करण्याचा प्रयत्न केला.प्रयोगशाळेतील विविध प्रयोगांची मोठ्या कुतूहलाने पाहणी केली व प्रयोगाचा आनंद घेतला.तसेच माझी पृथ्वी ,परिसरातील माझे सोबती याविषयी चित्रे काढली.तसेच विज्ञानाच्या संकल्पना या विषयी निबंध लिहिले.तसेच विज्ञान चे महत्त्व या विषयी सर्व शिक्षकांनी माहिती दिली .या प्रकारे मोठ्या उत्साहाने व आनंदाने राष्ट्रिय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.