शेट च.ग.शहा विद्यामंदिर लेंगरे च्या १९९९ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी १५ मे २०२४ रोजी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित केला आहे.सदर मेळाव्यामध्ये शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी तसेच शिक्षक हा समाजाला दिशा देणार महत्वाचा घटक आहे.शिक्षक हा समाज जागृतीचे प्रेरणास्थान आहे.तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शना मुळे अनेक विद्यार्थी विविध पदावर पोहचली आहेत.त्यामुळे गुरुदक्षिणा म्हणून सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी सर्व शिक्षकाचे बंँड ,हालगी ,झांज लावून सकाळी ८ वा लेंगरे येथील मारुती मंदिर पासून शेट च.ग.शहा विद्यामंदिर लेंगरे इथे पर्यंत शिक्षक सन्मान रँली चे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील शिक्षकांच्या कार्याला सलाम करण्यासाठी एक आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे . शिक्षक सन्मान रँलीचे आयोजन समाजाचे शिक्षक प्रती असणारा आदरभाव व्यक्त करण्यासाठी केले असून सदर रँली मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री.आशिष कोले, श्री.सोमनाथ शिंदे सर, सचिन जाधव सर, श्रीकांत मोहिते, गणेश पवार, जितेंद्र शिंदे व १९९९ च्या बँच कडून केले आहे .
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा नियोजन खालीलप्रमाणे