उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लेंगरे केंद्राचे केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. लहान गटातील जनरल चॅम्पियनशिप जिल्हा परिषद शाळा लेंगरे शाळेला तर मोठ्या गटातील जनरल चॅम्पियनशिप जिल्हा परिषद शाळा मादळमुठी शाळेला मिळाली. तसेच सर्वसाधारण जनरल चॅम्पियनशिप जिल्हा परिषद शाळा मादळमुठी शाळेला मिळाली.
सन्मानीय गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील साहेब यांनी लेंगरे केंद्राचे कामकाज आदर्शवत असल्याचे कौतुकउदगार काढले. तसेच लेंगरे केंद्रातील सर्व शिक्षकांनी अतिशय अनोख्या पद्धतीने सुंदर अश्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल कौतुक केले. सौ.मनिषाताई बागल यांनी लेंगरे केंद्रातील सर्व शाळांचे काम आदर्शवत असून भविष्यात जिल्हा परिषद शाळांच्या विकासासाठी सर्व मदत करण्याचे जाहीर केले.
खानापूर पंचायत समिती सभापती सुवर्णाताई प्रशांत भोसले यांनी खानापूर तालुक्यातील शिक्षण विभाग चांगले काम करत असून भविष्यात सर्व जिल्हा परिषद शाळांचा पट व गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करू व जिल्हा परिषद शाळांच्या विकासाठी नेहमी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. प्रतिभाताई सुरेश शेंडे मॅडम नी पारितोषिक विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुलांनी भविष्यात चांगले यश मिळवावे अशा सदिच्छा दिल्या.
सन्मानीय दिलीपकुमार सानप साहेब यांनी प्रास्ताविक केले प्रास्ताविकाच्या झंझावती भाषणात साहेबांनी लेंगरे केंद्राच्या प्रगतीचा आढावा मांडला. शिक्षकांना व विद्यार्थ्यांना प्रेरणात्मक भाषणात साहेबांनी जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेत सदैव अग्रेसर राहतील याची ग्वाही दिली.
बक्षिस वितरण सोहळ्यानंतर दिमाखदार विविध गुणदर्शन सोहळा पार पडला.लेंगरे केंद्रातील लेंगरे, देवीखिंडी, भूड,मादळमुठी, वाळूज, कांडेसरवाडी , बोबडेवाडी, इंदिरा आवास, लेंगरे उर्दू, गुजलेवस्ती, शिवेचा मळा या शाळांनी छान प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व youtube Live चित्रण श्री. सोमनाथ शिंदे जिल्हा परिषद शाळा मादळमुठी यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार महंमदशफी पटेल मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा लेंगरे यांनी केले.
कार्यक्रमाचे देखणे नियोजन श्री महामदशफी पटेल सर अध्यक्ष क्रिडा व सांस्कृतिक समिती यांनी केले. त्यांना श्री. संजय कांबळे सर, धनाजी घाडगे सर, श्री. निशिकांत आयवळे सर, अशोक घाडगे सर, धनंजय कवडे सर, संपतराव तामखडे सर, जि. प.शाळा बोबडेवाडी चे मुख्याध्यापक खिलारे सर, संपतराव निकम सर, अजयकुमार क्षीरसागर व जि. प. उर्दू शाळेचे मुख्याध्यापक यांचे सहकार्य लाभले सन्मानीय बाळासाहेब जावीर सर व शाहनवाज मणेर सर यांचीही या सोहळ्याला उपस्थित लाभली.
कार्यक्रमातील क्षणचित्रे
Live कार्यक्रमाची YouTube Link


.jpg)












